शरद कृषी महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश

जैनापूर : राम आवळे  

दि.१८ ; जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या अंतर्गत पानिव (जि. सोलापूर) येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून तृतीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत दहा जिल्ह्यांतील एकूण २४  संघांनी सहभाग नोंदवला होता. तीव्र स्पर्धेत शरद कृषी महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळ करत तृतीय क्रमांक पटकावला.यशस्वी खेळाडूंना संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) व एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघाला प्राचार्या डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके आणि क्रीडाशिक्षक दादासाहेब मगदूम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांनीही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.