श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये अक्षरशिल्पांचे प्रदर्शन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१३: येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांतर्गत “अक्षरशिल्प” या अभिनव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.हे प्रदर्शन राजेंद्र कडाळे यांच्या संकल्पनेतून साकारले गेले.प्रसिद्ध अक्षरलेखक उत्तम तळवार यांनी सादर केलेल्या या प्रदर्शनात मराठी अक्षरांचे विविध कलात्मक नमुने मांडण्यात आले होते.

टाकाऊ साहित्यापासून तयार केलेली आकर्षक अक्षरे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.विविध साहित्यिकांनी लिहिलेल्या हस्तलिखित पत्रांचे नमुनेही प्रदर्शित करण्यात आले होते.तसेच नामवंत अभिनेते व कलाकार यांच्या पत्रलेखनाचे नमुने पाहायला मिळाले.अक्षरलेखनाच्या इतिहासाबद्दल तळवार सरांनी सविस्तर माहिती दिली.सुंदर व शिस्तबद्ध अक्षरलेखनाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले.त्याचबरोबर प्रत्यक्ष काही अक्षरनमुने लिहून दाखवून प्रात्यक्षिकही सादर केले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्सुकतेने हे प्रात्यक्षिक अनुभवले.प्रदर्शनाला शाळेतील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळाला.अनेक विद्यार्थिनींनी प्रश्न विचारून अक्षरलेखनाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका ए. एस. काजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपमुख्याध्यापिका व्ही. एस. लोटके उपप्राचार्य व्ही.जी. पंतोजी,पर्यवेक्षक एस. एस. कोळी ,पर्यवेक्षिका एन. एम. कांबळे या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. धांतूडे यांनी प्रभावीपणे केले.संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.अक्षरशिल्प प्रदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये लेखनकलेची आवड निर्माण झाली.तसेच मराठी भाषेप्रती अभिमान वाढीस लागला.अशा उपक्रमांमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच भर पडली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.