डीकेटीईच्या सीएसई विभागाचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पुणे येथे दिमाखात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.१९: जानेवारी -येथील डीकेटीर्ई इन्स्टिटयूट मधील कम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग विभागातर्फे माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा पुणे येथे नुकताच दिमाखात पार पडला. पहिल्या बॅचपासून ते २०२४ बॅचपर्यंतचे सुमारे १०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक गेट-टुगेदरला उपस्थित राहून मातृसंस्थेशी असलेले अतुट नाते अधिक दृढ केले.
देश विदेशात विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी एकत्र येवून पुणे येथे या मेळाव्याचे आयोजन केले होते यामुळे या मेळाव्याला अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण लाभले. अनेक वर्षानंतर पुन्हा भेटलेल्या मित्रमैत्रणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपापल्या यशस्वी वाटचालीचे अनुभव शेअर केले.
संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ एल.एस.आडमुठे यांनी प्रास्ताविकात डीकेटीईच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व अद्यौगिक वाटचालिचा सविस्तर आढावा घेतला. माजी विद्यार्थ्यांच्या कतृत्वामुळेच आज डीकेटीईचे नाव जागतिक पातळीवर सन्मानाने घेतले जात आहे. जगातील प्रत्येक कानाकोपा-यात डीकेटीईचा माजी विद्यार्थी यशस्वीरित्या कार्यरत असून यामुळे डीकेटीईच्या माजी विद्यार्थ्यांची संघाटना आज भक्कम झाली आहे. असे गौरवाद्गार काढले. सर्व माजी विद्यार्थ्यांत एकमेकात सहकार्य व सामंजस्य वाढविण्याची तसेच मातृसंस्थेच्या असेच संपर्कात राहण्याचे आवाहन डायरेक्टर डॉ आडमुठे यांनी यावेळी केले. माजी विद्यार्थी हे इन्स्टिटयूटचे आधारस्तंभ आहेत अशी भावना व्यक्त केली.
कॉम्पुटर विभागप्रमुख डॉ.डी.व्ही. कोदवडे यांनी विभागाच्या शैक्षणिक व संशोधनात्मक प्रगतीची माहिती देत माजी विद्यार्थ्यांचे विषेश कौतुक केले. या संमारंभास पुणे सारख्या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती ही संस्थेशी असलेल्या त्यांच्या जीव्हाळयाच्या नात्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा स्नेहमेळाव्यामुळे विद्यार्थ्यांची मातृसंस्थेशी असलेली अपुलकी अधिक दृढ होते असे सुतावाच काढले.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या प्रभवी सोशल नेटवर्कमुळे संस्थेतील सर्व घडामोडी नियमीतपणे पहायाला मिळत असल्याने आजही आपण डीकेटीई कुटुंबाचा अविभाज्य घटक असल्याची भावना व्यक्त केली. अनुभव, आठवणी व विचारांची मुक्त देवाणघेवाण होत कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरुप प्राप्त झाले.
कार्यक्रम संपन्न होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी अवाडे व सर्व ट्रस्टी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे स्वागत प्रा.के.एस.कदम यांनी केले तर आभार प्रा. मानसी खानाज यांनी केले. या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख डॉ एस.के.शिरगावे, डॉ.टी.आय.बागबान, प्रा. यु.ए.नुली, यांची उपस्थिती होती तर प्रा. एस.एस. संगेवार, प्रा. डी.एम. कुलकर्णी, प्रा. एस.आर.पाटील यांनी विशेष प्रयत्न घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!