नाशिकच्या अवकाशात सूर्यकिरण टीमने साकारले बलशाली भारताचे प्रतिबिंब

हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनी भारावले नाशिककर,

नाशिक,: प्रतिनिधी 

दि. २३:नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात शुक्रवारी भरदुपारी सूर्यकिरण एरो शो मुळे जणूकाही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होतेभारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने साकारलेल्या एरोबॅटीक शोचे. या प्रात्यक्षिकावेळी अवकाशात केशरीपांढरा आणि हिरवा रंग भरत बलशाली भारताचे प्रतिबिंब साकारले होते.याबरोबरच भारत माता की जय वंदे मातरम् च्या जयघोषाने गंगापूर धरण परिसर दुमदुमला. तसेच सूर्यकिरण टीमने शेवटचे प्रात्यक्षिक सादर करीत नाशिककरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले.

            भारतीय वायू दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत दोन दिवसीय एरोबॅटिक शो गंगापूर धरण परिसरात पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळआमदार दिलीप बनकरजिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवलेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामकुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंहमहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीजिल्हाधिकारी आयुष प्रसादआशिमा मित्तल (जालना)जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवारपोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलअपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाणहेमांगी पाटीलसहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबेकश्मिरा संख्येजिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदेजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त)ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळनिवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह सैन्य दलासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            भारतीय वायू दलाचा एरोबॅटिक शो पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. धरणाच्या सभोवतालच्या भागात नागरिक उपस्थित होते. हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमने थरारक प्रात्यक्षिके सादर करीत नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर तेजेश्वर सिंहललित वर्माराहुल सिंहएडवर्ड प्रिन्सश्री. विष्णूअंकित वशिष्टसंजय सिंहविंग कमांडर जसबीर सिंहअभिमन्यू त्यागी यांनी वायू दलातील हॉक 132 या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या टीमने आकाशात रंगांची उधळण करताना इंग्रजीतील वायमिग विमानबाणप्रेमाचे प्रतिक साकारत नाशिककरांना समर्पित केले. तत्पूर्वी देशभक्तीपर विविध गीतांमुळे परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध देशभक्तीपर गीते सादर केली. या प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन फ्लाइट लेफ्ट. कवल संधू यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शोसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणीनाश्तास्वच्छताआरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपदा मित्रस्वयंसेवकलाइफ जॅकेटथ्रो बॅग्जसह आवश्यक साधनेउपकरणांनी सज्ज होता. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक गंगापूर धरणात गस्त घालत होते. तर कार्यक्रमापूर्वी ऑलम्पिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी गंगापूर धरणात नौकानयनची प्रात्यक्षिके सादर केली.

 

            मंत्री दादाजी भुसे म्हणाले कीडोळ्यांचे पारणे फेडणारा अशा एरोबॅटिक शोसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण होऊन ते सैन्य दलात भरतीसाठी प्रवृत्‍त होतील. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याची ही पूर्वतयारी म्हटली पाहिजेअसेही त्यांनी सांगितले. मंत्री झिरवाळ म्हणाले कीनाशिक शहरात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नाशिकच्या वैभवात भर पडून नाशिकचा नावलौकिक उंचावणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!