बँकर्स प्रिमियर लिग हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी संघ चषकाचा मानकरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१९:येथील शेळके मळा, आरसी टर्फ येथे इंटरबँक ‘भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा’ रविवार दिनांक १८/०१/२०२५ रोजी आयोजित करणेत आली. सदर स्पर्धेतील सर्व चषकाचे स्पॉन्सर यड्राव को-ऑप. बँक लि., यड्राव असून या स्पर्धेत श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस रक्कमेसह चषकावर आपले नाव कोरले.
सदर स्पर्धत श्री आदिनाथ बँक, यड्राव बँक, सन्मती बँक, दि इचलकरंजी मर्चट बँक व नांदणी बँक या सहकारी बँकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला होता. अंतिम सामन्यात श्री आदिनाथ बँक संघाने प्रतिस्पर्धी सन्मती बँक संघावर निर्णायक विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. संघातील खेळाडूंनी फलदांजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट समन्वय दाखवून उपस्थितांची मने जिंकली.
या यशाबद्दल श्री आदिनाथ बँकेचे चेअरमन श्री. बाळासाहेब चौगुले, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व सर्व कर्मचा-यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. खेळामुळे संघभावना, शिस्त व आरोग्य संवर्धनास चालना मिळते असे मान्यवरांनी मत व्यक्त केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!