घरफोडी करून दागिने व रोख रक्कम लंपास; शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागरिकांना तक्रारी सादर करण्याचे आवाहन

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि.१७: तारदाळ(ता .हातकंणगले ) परिसरात अज्ञात सात इसमांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विक्रांत राजाराम गायकवाड (वय ४६, रा. प्रसाद कुलकर्णी मळा, तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.५० वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.घरातील कपाटातील सोन्याचे मनीमंगळसूत्र (सुमारे ८ ग्रॅम), कानातील सोन्याच्या रिंगांचा जोड (५ ग्रॅम), चांदीचे पैंजण जोड तसेच ५०० रुपयांच्या नोटांमध्ये २५ हजार रुपये अशी रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेण्यात आली. एकूण सुमारे १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.घटनेनंतर आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करून धमकी दिल्याचाही उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८, ३३९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.