आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना महानगरपालिकेकडून विनम्र अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १७ : इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर व उपायुक्त विद्या कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, सहाय्यक आयुक्त रामचंद्र कांबळे, सहाय्यक कर संकलन अधिकारी दीपक खोत तसेच सदाशिव जाधव, संदीप जोशी, प्रदीप झमरी, प्रविण बुगड, सचिन शेडबाळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमात लहुजी साळवे यांच्या सामाजिक कार्याचा आणि समाजप्रबोधनातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.