JEE Main 2026 मध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूट पश्चिम महाराष्ट्रात अव्वल
उत्कृष्टतेचे नवे पर्व; 99 पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळवणारे 19 विद्यार्थी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२१: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या JEE Main 2026 (सेशन 1) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
संस्थेचा विद्यार्थी प्रणव बागरेचा याने 99.97 पर्सेंटाइल मिळवून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत संस्थेचे वर्चस्व सिद्ध केले. त्याचबरोबर कु. पाटील सोहम (99.90), कोरे प्रणव (99.77), म्हेत्रे मनस्वी (99.76), सस्ते पियुष (99.75), आशिष जहांगीरदार (99.72), तोतला श्रेष्ठ (99.69), नवले अनुज (99.53), नलावडे सायली (99.45), पाटील समृद्धी (99.37), धैर्य चौधरी (99.36), दाते अभेद्य (99.29), कापडी अथर्व (99.27), साखरे पृथ्वीराज (99.24), खोत मानसी (99.23), कदम नीलभ (99.8), तोतला मयंक (99.7), कदम अजिंक्य (99.7), अडसुळे हर्षल (99.3) आदी विद्यार्थ्यांनी 99 पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळवत दैदीप्यमान यश मिळवले.तसेच केसवानी प्रांजल (98.96), पाटील ईश्वरी (98.96), घाटुळे संकेत (98.91), गंगारडे श्रेया (98.85), पाटील अनन्या (98.84), गडदे अथर्व (98.79), भुइंगडे सोमनाथ (98.77), शिंदे प्रणव (98.73), काबरा जान्हवी (98.65), कदम सुशांत (98.63), लाड योगेश्वरी (98.61), शिंदे अनिकेत (98.56), तेलसिंगे पूर्वा (98.54), गडदे वेदांत (98.54), चव्हाण आर्या (98.54), दानवाडे मुशरत (98.52), पाटील सौमित्र (98.47), कोळके रजत (98.35), रेपे अथर्व (98.31), पाटील विरेन (98.26), कुंभार विवेक (98.18), पवार वेदांत (98.16), कबाडे आदित्य (98.13), ढेंबरे मयुरेश (98.10), पाटील आदित्य (98.10), बाहेती रोनक (98.10) या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.या निकालात 99 पर्सेंटाइलहून अधिक गुण मिळवणारे तब्बल 19 विद्यार्थी असून 90 पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 158 इतकी आहे. विशेष म्हणजे हे सर्व निकाल एकाच शाखेतून लागल्याने श्रद्धा इन्स्टिट्यूटने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे यांनी सांगितले की, “यशाची उंची गाठण्यासाठी योग्य नियोजन आणि अपार कष्टांची जोड आवश्यक असते. योग्य मार्गदर्शनाखाली घेतलेले परिश्रमच अशा असामान्य निकालात परिवर्तित होतात.”या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे, समन्वयक एम. एस. पाटील, सौ. संगीता पवार, सौ. सुप्रिया कौंदाडे, श्री. अभिषेक तांबे व सौ. सृष्टी तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.दरवर्षी अभूतपूर्व निकाल देत उत्कृष्टतेचा नवा अध्याय लिहिणारी श्रद्धा इन्स्टिट्यूट यंदाही पश्चिम महाराष्ट्रात यशाचा नवा मानदंड प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.