शाहापूर येथे चाकूहल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२१: जुन्या वादाच्या रागातून शाहापूर येथे चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून यात एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी शाहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९ अन्वये नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोदकुमार पुंडलिक राजरत्न (वय ४६, व्यवसाय – बँक्वेट कॉन्ट्रॅक्टर, रा. जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी गणेश रावसाहेब सडतळे (रा. होणवाडी, ता. चिकोडी, राज्य कर्नाटक; सध्या रा. गांधी पुतळा जवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले) याने चाकूने हल्ला केला.ही घटना दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास शाहापूर येथे एस. एस. ई. बी. पॉवर हाऊसजवळ घडली. जखमी राजू कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.दि. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी व जखमी राजू कांबळे यांना “आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत अचानक चाकू काढून हल्ला केला, अशी तक्रार आहे. यात राजू कांबळे यांच्या पोटावर वार करण्यात आला तसेच फिर्यादीवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.घटनेची नोंद सायंकाळी ५.३२ वाजता करण्यात आली असून पुढील तपास पो. स. ई. श्री. कुरटे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.