Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
अतिग्रे: सलीम मुल्ला
दि.२१: जे.ई.ई. मेन्स फेज -१ मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये संजय घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमी च्या अथर्व खोत याने ९९.९४ पर्सेटाईल गुण मिळवून अभुतपुर्व यश संपादन केले.
संस्थेच्या सहिम पटवेगार (९९.८१) उपेंद्र तेलसंग (९९.८०) विवेक तोडकरी (९९.७९) अथर्व निर्वाणे (९९.७८), तनय दागा (९९.७६) पर्सेटाईल गुण मिळवून विद्यार्थ्यानी उल्लेखनीय कामगिरी केली . सहिम पटवेगार या विद्यार्थ्याला फिजिक्स या विषयामध्ये १०० पर्सेटाईल गुण मिळाले. संस्थेच्या २२ विद्यार्थ्यानी ९९ पर्सेटाईल च्या वरती गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक श्री वासू सर यांनी अभिनंदन केले आहे. या प्रसंगी बोलतात ते म्हणाले की, सातत्य म्हणजेच यशाची गुरुकिल्ली आहे. योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले आहे.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.