ए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.२३: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कसबा बावडा येथे ए.एन.एम. प्रथम वर्ष विद्यार्थीनींचा शपथविधी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. वाडीकर यांनी परिचर्या सेवेचे समाजातील महत्त्व, रुग्णसेवेतील संवेदनशीलता व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. आरोग्य सेवेतील परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून विद्यार्थीनींनी सेवाभाव जपत कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमास तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. विक्रम आरळेकर, सेवा रुग्णालयाच्या सहायक अधिसेविका श्रीम. एस.एस. रासने, तसेच छ.प्र.रा.स. रुग्णालयाच्या प्रभारी सहायक अधिसेविका श्रीम. एस.एस. भिवसे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता सुरवसे, पाठ्यनिर्देशिका यांनी तर श्रीम. ए.बी. हराळे, पाठ्यनिर्देशिका (एन.एच.एम.) यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.