डिंगणी येथे रंगला संगमेश्वर प्रीमियर लीग पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा थरार,तालुक्यातील पहिलीच पावसाळी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
संगमेश्वर:
शनिवार दिनांक 23 जुलै व रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी संगमेश्वर तालुक्यातील प्रतिभावंत क्रिकेट खेळाडूंना आपली क्रिकेट मधील कामगिरी दाखवण्यासाठी प्रथमच संगमेश्वर प्रीमियर लीग 2022 चे आयोजन श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, काष्टेवाडी,डिंगणी येथे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला खेळाडू,प्रेक्षक तसेच अनेक संघांचा उत्तुंग असा प्रतिसाद मिळाला.स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.यामध्ये सर्वच संघांनी आपल्या खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली.संगमेश्वर प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचे मानकरी वरद इलेव्हन संघ,द्वितीय क्रमांक रूद्र कस्तुरी इलेव्हन,तृतीय क्रमांक कुणबी युवा संगमेश्वर आणि चतुर्थ क्रमांक डॉ. खाडे एलेव्हन या संघाने पटकावला.
स्पर्धेत आपल्या खास खेळाडू शैलीने प्रभावित केलेल्या खेळाडूंमध्ये मालिकावीर चा किताब जिंकला तो संजीवन कांबळे यांनी तसेच उत्कृष्ठ फलंदाज यतीन भुरवणे उत्कृष्ठ गोलंदाज सुमित वाघधरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कौस्तुभ सर्वोत्तम कर्णधार संजीवन कांबळे हे सर्व खेळाडू आणि संघ या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले.स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य करणारे सर्व संघ मालक,खेळाडू,कर्णधार,प्रेक्षक तसेच स्पर्धा यशस्वी करण्यास मदत करणारे सर्व देणगीदार यांचे विशेष आभार मानून संगमेश्वर प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राची सांगता करण्यात आली. पावसाळी क्रिकेट स्पर्धा ही तालुक्यातील पहिलीच स्पर्धा असल्याचे बोलले जात होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.