संगमेश्वर येथील निनावी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव घटस्थापना व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून सुरूवात

*
संगमेश्वर:
संगमेश्वर येथील निनावी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव घटस्थापना व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून सुरूवात होईल. या कालावधीत दिवस रात्र भक्त भाविक मातेचा जागर करतात तसेच ओट्या भरून बोललेले नवस पुर्ण करित असतात. विविध गावची भजन मंडळे आपले भजन सादर बरेच वर्षापासून निनावी देवी मंदिरामध्ये उबलबारी भजनाचे जंगी सामने व कलेचे सादरीकरण विविध जिल्ह्यातून तसेच मुंबई मधून आनून मनोभावे सेवा करून देवीला प्रसन्न करतात.
यावर्षी आंब्रे बंधू यांनी सोमवारच्या प्रथम दिनी सायंकाळी ६ ते ८ वाजता स्वयंम प्रसादिक भजन मंडळ पाटगांव देवरूख बुवा प्रदीप लिंगायत तसेच रात्री ११.०० वाजल्यानंतर संगमेश्वरी भजन मंडळ तालुका संगमेश्वर यांचा अभंगवाणी कार्यक्रम समस्त आंब्रे बंधू गटाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.