मणेरे शिक्षण संकुलनात ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
जागतिक महिला दिन व महाराष्ट्रीय सण उत्साहात साजरे
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि .८ : श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, कुसुम ऑलिम्पियाड व मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयात शनिवार दि. ०८ मार्च रोजी जागतिक महिला दिन व महाराष्ट्रीय सण साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मा. श्री. सुधाकररावजी मणेरे, संस्थेचे उपाध्यक्ष, मा.श्री.सुभाष केटकाळे, संस्थेचे समन्वयक मा.श्री. अशोक वसगडे हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका मा.सौ.शाल्वी मणेरे मॅडम व कबनूर ग्रामपंचायत सरपंच मा.सौ. सुलोचना कट्टी मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मा.श्री. सुधाकरराव मणेरेसो यांनी आपल्या मनोगतात “ थोर स्त्रियांच्या अगाध आत्मशक्तीची महती व्यक्त केली ”, “आजच्या आधुनिक युगातील स्त्रियांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले कार्य करावे व स्त्रियांचा अभिमान राखावा”. असे विचार व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे उद्योजिका मा.सौ.शाल्वी मणेरे मॅडम यांनी माता पालकांना व विद्यार्थ्याना चांगल्या सवयी व आरोग्याविषयी उपयुक्त अशी माहिती दिली. कबनूर ग्रामपंचायतसरपंच मा.सौ. सुलोचना कट्टी मॅडम यांनी जागतिक महिला दिनाविषयी विद्यार्थी व पालक यांच्याशी सुसंवाद साधून मौलिक असे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी महाराष्टीय सण या उपक्रमामध्ये गुढीपाडवा, बेंदूर, वटपौर्णिमा, दीपअमावस्या, आषाढी एकादशी, गोपाळकाला, नागपंचमी, सत्यनारायण, शिवजयंती, ऋषीपंचमी, हरतालिका, गणेशचतुर्थी, रक्षाबंधन, घटस्थापना, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, नरक चतुर्दशी, मकर संक्रांत, महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा,नारळी पौर्णिमा, अक्षय तृतीया, भाऊबीज, लक्ष्मीपूजन, वसूबारस, होळी, बलीप्रतिपदा या सणांची मांडणी करण्यात आली व विद्यार्थ्यांनी सणाविषयी माहिती सांगितली.
या उपक्रमासाठी बालवाडीतील सौ. स्वाती ढेकळे, सौ. अश्विनी ओझा, सौ. सपना धनगर, सौ. सारिका ढोबळे, सौ. शुभांगी सुतार या शिक्षकांचे उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ.केतकी काळे यांनी केले. तर आभार संस्थेचे समन्वयक श्री. अशोक वसगडे यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ.पुष्पा ऐनापूरे, हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, कॉलेज विभागप्रमुख सौ. दिपाली चौगुले , बालवाडी विभागप्रमुख सौ. स्वाती ढेकळे, अॅकडमी विभागप्रमुख श्री. शैलेश कांबळे तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.