संगमेश्वर:
न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज कसबा-संगमेश्वर या विद्यालयात आज दि.15 आॕगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. ए. मणेर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला.विद्यालयाचे प्राचार्य श्री मणेर सर हे डिसेंबर 2022 अखेर आपल्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.त्यांनी आपल्या नेतृत्वात विद्यालयाला अनेक बहुमान मिळवून दिलेले आहेत.त्यामुळे शाळेला गतवैभव प्राप्त झालेले आहे.शाळेच्या व संस्थेच्या विकासात त्यांनी दिलेल्या बहुमोल योगदानामुळे स्वातंत्र्यदिनी संस्थेने ध्वजारोहणाचा मान मणेर सर यांना देऊन एक कर्तव्यदक्ष नेतृत्वाचा बहुमान केलेला आहे.या कार्यक्रमाला संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी कसबा-संगमेश्वर या संस्थेचे अध्यक्ष कॕप्टन अकबर खलपे,उपाध्यक्ष नियाज कापडी,उपाध्यक्ष इब्राहिम काझी,सचिव सईदअहमद उपाद्ये,सहसचिव शौकतअली खलपे,खजिनदार शुकूर गैबी,सर्व सदस्य,पर्यवेक्षिका सौ.एल. एन.मणेर,इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका श्रीमती ए. एम.जुवळे,दोन्ही माध्यमाचे शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ठीक 8:00
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी देण्यात आले.त्यानंतर कसबा गावातून मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर घोषणांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली.भर पावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.प्रभातफेरी कसबा हायस्कूल,काझी मोहल्ला,आझाद मोहल्ला,लेंडी,तीन बत्ती नाका ते पुन्हा हायस्कूल अशी काढण्यात आली.
प्रभातफेरीच्या वेळी कसबा लेंडी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन आकाश दणाणून सोडले.अशा उत्साही वातावरणात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यालयात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व पर्यवेक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक शिक्षक एस.ए.पटेल यांनी केले.