मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी मघ्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५मधील इ. १० वी ची पहिली पालक मिटिंग संपन्न

कबनूर : हबीब शेखदर्जी 

दि .२५ : श्री.डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी, येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५मधील इयत्ता १० वी ची पहिली पालक मिटिंग संपन्न झाली. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मा. श्री. सुधाकरराव मणेरे, उपाध्यक्ष मा.श्री. सुभाष केटकाळे व संस्थेचे मार्गदर्शक मा. श्री. अशोक वसगडे सर उपस्थित होते. 

मणेरे हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे यांनी आपल्या प्रास्ताविकेत, “विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून विषयाच्या काठीण्यपातळीनुसार अभ्यासाचे नियोजन करावे व आपली प्रगती साधावी, त्याचप्रमाणे ज्यादा तास व स्टडीचा उपयोग करून घ्यावा अशी सूचना केली. संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री. अशोक वसगडे सर यांनी विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टाचे चीज करावे व आपले उज्वल भविष्य घडवावे व त्यासाठी शिक्षकांच्या बरोबरीने पालकांनीही मुलांना सहकार्य करावे असे मार्गदर्शनपर मत व्यक्त केलं मा. श्री. सुधाकरराव मणरे यांनी आपल्या भाषणात विद्याच्यांच्या प्रगतीसाठी शाजा सदैव तत्पर असते त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी कार्यरत राहावे.यावेळी मणेरे हायस्कूल व कॉलेज प्राचार्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली मंगसुळे, उपमुख्याध्यापिका सौ.संगिता व्हनबट्टे, सर्व विभागप्रमुख शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.