इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२९: जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शालेय शासकीय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी वंदे मातरम् मैदान येथे झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थिनींनी आपापल्या वजन गटात यश मिळविले.
५८ किलो वजन गटात इयत्ता नववी ‘ब’ तुकडीतील श्रेया अमोल जाधव हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर ४८ किलो वजन गटात इयत्ता सातवी ‘ब’ तुकडीतील समीक्षा सागर लवटे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. या दोन्ही खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकरसो, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमनकर तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या लोटके, उपमुख्याध्यापक श्री. एस. एस. कोळी, उपप्राचार्या सौ. सुजाता कवळेकर, पर्यवेक्षिका श्रीमती हेमांगी संकपाळ, पर्यवेक्षक श्री. विकास कांबळे व ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. डी. कोळी यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. जिमखाना प्रमुख श्री. बी. एस. माने, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक उत्तम मेंगणे, क्रीडा शिक्षक के. ए. पाटील व व्ही. के. पाटील मॅडम यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.