वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व संस्थेचे संस्थापक मा.डॉ. श्री.सुधाकररावजी मणेरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कबनूर : हबीब शेखदर्जी 

दि .८ :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ.कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक मा.डॉ. श्री.सुधाकररावजी मणेरे यांचा वाढदिवस झांजपथकाच्या गजरात उत्साहात साजरा झाला.

                या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे किशोर करिअर पॉईटचे संस्थापक मा.श्री.विशाल पागडे सर उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मा. डॉ. श्री.सुधाकरराव मणेरे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळेसो, संस्थेचे ट्रस्टी  मा. श्री.शितलकुमार मणेरेसो, मा.श्री.अनिलकुमार मणेरेसो, मा.सौ.ज्योती मणेरे, मा. सौ.साक्षी मणेरे, मा.सौ. शाल्वी मणेरे, कबनूरचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य मा.श्री.मधुकर मणेरे, कबनूरचे माजी पोलीस पाटील मा. श्री. अरुण मणेरे, माजी सरपंच मा. श्री.प्रदीप मणेरे, माजी शिक्षण अधिकारी मा. श्री.बी.बी.भंडारे,  शांतीनाथ पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री. मिलिंद कोलेकबनूरचे माजी मुख्याध्यापक मा. श्री. सुभाष काडाप्पा, प्रगतशील शेतकरी मा. श्री. शांतीनाथ कोले, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. खंडेराव परीट व संस्थेचे समन्वयक मा.श्री. अशोक वसगडे उपस्थित होते. तसेच कबनूरचे प्रतिष्ठीत नागरीक व विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे मा.श्री. विशाल पागडे सर यांनी “ हुशार विद्यार्थी घडविणारी शाळा ,शाळेची प्रगती व K.C.P. स्थापनेमागील मार्गदर्शक म्हणून मा. डॉ श्री.सुधाकरराव मणेरे यांचे नाव आहे.” असे प्रांजळपणे आपले मत व्यक्त केले. मा.श्री. सुभाष काडाप्पा सर यांनी “शिस्तप्रिय, हुशार व कर्तृत्ववान पिढी घडविण्याचे कार्य या शाळेतील शिक्षक करीत असतात. त्यांच्यामुळे व मणेरे काकांच्या मार्गदर्शनामुळे शाळेचा प्रगतीचा आलेख चढत चालला आहे.” याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अध्यक्षीय भाषणात “ विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा विचार करून आपले अस्तित्व निर्माण करा” असा मार्गदर्शनपर उपदेश केला. मा.श्री.मणेरे काकांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या समारंभात गुणवंत व क्रीडा क्षेत्रात सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

                    यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शिल्पा करपे, सौ.केतकी काळे, प्रास्ताविक श्री.निवास तोडकर व आभार प्राथ.मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापूरे  यांनी मानले.

            मणेरे हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, प्राथ.मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापुरे,  सर्व विभागाचे विभागप्रमुख,  शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.