कुसुम ऑलिंपियाडच्या नवीन वास्तूचे उद्घाटन माननीय डॉ.श्री.राहुलजी आवाडेसाो यांच्या शुभहस्ते संपन्न

कबनूर : हबीब शेखदर्जी 

दि.११ जानेवारी २०२५ : डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ.कुसुमताई बालमंदिर व प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिंपियाड यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात कुसुम ऑलिंपियाडच्या नवीन वास्तूचे उद्घाटन माननीय डॉ. श्री.राहुलजी आवाडेसाो यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सदरचा कार्यक्रम मणेरे शैक्षणिक संकुलाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे औचित्य साधून पार पडला.य कार्यक्रमात उपस्थित मा.डॉ.श्री.राहुलजी आवाडे यांनी मणेरे शैक्षणिक संकुलाचा खडतर प्रवासाचे वर्णन करत त्यांनी य संकुलाच्या प्रवासात येणाऱ्या अडचणीच्या वेळी मदत करण्याची ग्वाही दिली.आणि संस्थेचे पालकत्व स्वीकारले तसेच आजच्या या शैक्षणिक संकुलाने केलेल्या प्रगतीचे कौतुक ही केले. अनेक आठवणींना उजाळा देत त्यांचे ऋणानुबंधाचा स्नेह आणखी वाढविला.संस्थेचे संस्थापक मा.डॉ.श्री.सुधाकाररावजी मणेरेसाो यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक मा.डॉ.श्री.सुधाकाररावजी मणेरेसाो (काका), संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुभाष केटकाळे सर तसेच सौ.मोसमी आवाडे, श्री.सुभाष काडाप्पासाो,सौ.सुलोचना कट्टी,श्री.मधुकर मणेरेसाो,अरुण मणेरेसाो,श्री.निलेश पाटील,श्री.बबन केटकाळे,तसेच. संस्थेचे ट्रस्टीज श्री.शितलकुमार मणेरे,श्री.अनिलकुमार मणेरे,सौ.ज्योती मणेरे,सौ.साक्षी मणेरे तसेच सौ.शाल्वी मणेरे,श्री. सम्मान मणेरे उपस्थित होते व संस्थेचे समन्वयक श्री.अशोक वसगडे सर यांनी संस्थेची सद्य परिस्थितीचा आढावा कथन केला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शिल्पा करपे, प्रास्ताविक प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे व मानपत्राचे वाचन व आभार श्री.शैलेश कांबळे यांनी मानले.
मणेरे हायस्कूल व ज्यु.कॉलेजच्या प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, प्राथ.मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापुरे, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.