डी के ए एस सी कॉलेज मध्ये कोविड – १९ लसीकरणासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

इचलकरंजी: प्रतिनिधी

येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र तांबे माळ एन सी सी व एन एस एस विभाग यांच्यामार्फत कोविंड 19 लसीकरण मोहीम बुधवार दिनांक 13 10 2021 रोजी पार पडली या लसीकरणा मध्ये 18 वर्षे पूर्ण झालेले व 18 वर्षे चालू असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले लसीकरणा मध्ये कोवीशील्ड व कोव्हकसिन दोन्ही लसीचा समावेश करण्यात आला ज्यांना दुसरा डोस हवा असेल त्यांनाही लसीकरण करण्याची सोय करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस ढेकळे अध्यक्ष स्थानी होते आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना लसीचे महत्त्व व महाराष्ट्र मध्ये झालेल्या लसीकरणाची टक्केवारी सांगून आपण या महामारी ला सामोरे जाताना सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे व लसीकरणानंतर ही आहे आपण कोव्हिड 19 पासून सुरक्षित राहण्यासाठी सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करणे गरजेचे आहे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अरुण कटकोळे कार्यक्रमाचे आभार प्रा मेजर मोहन वीरकर यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील प्रा. विजय पाटील प्रा. हराळे डॉ. वेल्लाळ प्रा डॉ. सांबारे प्रा. मुंगारे उपस्थित होते या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन मेजर विरकर व अरुण कटकोळे यांनी केले प्राथमिक आरोग्य केंद्र तांबे माळ येथील सौ. मेघा सावंत सौ ज्योती पाटील सुनिता मगदूम कार्यक्रमासाठी हजर होते या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदविला