जैनापूर: प्रतिनिधी
दि १६: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीची विद्यापीठ खो-खो संघात निवड कु. प्रगती संतोष कर्नाळे हिची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या खो-खो संघात निवड झाली आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देश पातळीवर होणाऱ्या बाविसाव्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अॅग्री स्पोर्ट्स २०२४-२५ ह्या स्पर्धा होणार आहेत. आचार्य नरेंन्द्र कृषी एवं प्रौद्योगीक विश्वविद्यालय कुमार गंज अयोध्या( उत्तर प्रदेश) येथे स्पर्धा होणार असून त्या स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात कु. कर्नाळे हिची निवड झाली आहे.
तसेच ५७ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ह्या जगन्नाथ पुरी (ओरिसा) येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यामध्ये कु. प्रगती कर्नाळे ही सहभागी होती.
तिची संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, क्रीडाशिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.