इचलकरंजी –विजय मकोटे
दि: 21 येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचा 27 वा वर्धापनदिन सोहळा संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. सदर वर्धापनदिन सोहळ्यास संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक तसेच परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या प्रधान कार्यालय येथे संस्थेचे संचालक श्री पंकज मेहता यांचे हस्ते सत्यनारायण पुजा संपन्न होऊन येणा-या मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री. जवाहर छाबडा, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र राशिनकर , कार्यकारी संचालक श्री जगदीश जोशी तसेच संस्थेच्या अन्य शाखांमध्ये श्री. उदय भागवत, श्री. अरविंद कुलकर्णी, श्री. शांतिनाथ शिरगांवे, श्री सुकूमार देवमोरे, श्री. राकेश अग्रवाल, श्री. नरोत्तम लाटा, श्री. प्रकाश गायकवाड हे सर्व संचालक सभासद व हितचिंतक यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
श्री आर्य चाणक्य सहकारी पतसंस्थेच्या सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी टाकलेल्या विश्वासामुळेच संस्था प्रगतीचे टप्पे पार करीत असून सध्या संस्थेच्या ठेवी रु. 150 कोटी इतक्या असून कर्जवाटप रु. 100 कोटी इतके झालेले आहे. संस्थेस सन 2020-21 मध्ये रु. 2 कोटी 81 लाख इतका नफा झालेला असून चालू सालात सभासदांना 11% लाभांश जाहीर केलेला आहे. संस्थेच्या विविध ठेवी व कर्जांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी परिसरातील ग्राहकांना घर खरेदी, घर बांधकाम, फ्लॅट खरेदी यासाठी चाणक्य घरकूल योजना अंमलात आणलेली असून सदर योजनेत बांधकाम अंदाजपत्रकाच्या 75% इतकी रक्कम कर्जाऊ मिळते. सदर कर्जास व्याज दर 11% तसेच मुदत 15 वर्षे आहे. सदर योजनेस बांधकाम परवान्याची आवश्यकता नाही. कर्ज मंजुरीपुर्वी कोणताही खर्च नाही. त्याचबरोबर सोनेतारण कर्ज योजना कमीत कमी कागदपत्रे व अत्यल्प कमी 9.5% व्याज दर व काही मिनिटांत कर्ज उपलब्ध त्याचबरोबर सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभुमीवर ग्राहकांचा इलेक्ट्रीक वाहन खरेदीकडे असलेला कल पाहता संस्थेने ई-बाईकसाठी 12% इतक्या कमी व्याज दराने योजना सुरु केलेली आहे. अशा सर्व कर्ज योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या असून सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. जवाहर छाबडा यांनी केले. याप्रसंगी अॅड. अक्षय खांडेकर, अॅड. एस. दरीबे, अॅड. सुनिल धुपदाळे, श्री. सुभाष छाबडा, प्रा. अशोकजी दाससर, श्री. नरेंद्र पुरोहीत, श्री गणेश भागवत, श्री. शिवप्रसाद ओझा यांचेव्यतिरीत अन्य मान्यवरांनी संस्थेस भेट दिली