प्रोबसतर्फे निवासी आरोग्य शिबीर

इचलकरंजी :हबीब शेख
         दि : 27 येथील रोटरी सेन्ट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबस क्लबच्यावतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवसीय निवासी आरोग्य शिबीर नुकतेच पार पडले. आंबा-पावनखिंड मार्गावरील मनोली हिल्स परिसरातील ’आनंदी विहार’ येथे क्लबच्या 27 पुरूष व महिला सदस्यांसाठी आरोग्यविषयक कार्यशाळा डॉ. कुबेर मगदूम व डॉ. प्रकाशराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या शिबीर प्रोजेक्ट कमिटीचे सुर्यकांत बिडकर, शिवबसु खोत व दिलीप शेट्टी यांनी नियोजन केले. प्रकाश दत्तवाडे, मोहन भिडे, डी. एम. बिरादार, श्रीमती जयश्री चौगुले यांनी वाहन व्यवस्थेचे नियोजन केले. या शिबीरात आहार, विहार, व्यायाम, योगासन, प्राणायम याबद्दल सदस्यांनी आपले अनुभव सांगत प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये महावीर कुरूंदवाडे, अविनाश खोत, सौ. रेखा कांबळे, सौ. विणा श्रेष्ठी यांनी भाग घेवून इतरांना माहिती दिली. भोजन व्यवस्था एम . के . कांबळे, दिलीप भंडारे, अजित कोईक यांनी केली.
सायंकाळी संपन्न करमणुकीच्या कार्यक्रमात बाळासाहेब देवनाळ, रामचंद्र निमणकर, अ‍ॅड. विश्‍वास चुडमुंगे, पी. बी. जाधव यांनी सुरेख गाणी गायिली तर काशिनाथ जगदाळे यांनी अनेक कथा सादर केल्या. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून विशाळगड येथे जात असताना विशाळगडाच्या पायथ्याशी बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या पावनखिंड येथे दुसर्‍या दिवशी सकाळी क्लबच्या सदस्यांनी भेट दिली. तसेच परतीच्या मार्गावर जंगलसफारीचा आनंद घेतला. शिबीराच्या ठिकाणी मान्यवरांसमवेत सौ. राजश्री वाटेगावे, सौ. हसीना बागवान, सर्जेराव घोरपडे, प्रदिप लडगे, श्री. जाधव, ज्ञानदेव मेटे उपस्थित होते.