डीकेटीईच्या इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘सौरउर्जेवरील आकाश कंदील’

सौरउर्जेवरील स्वयंचिलत आकाश कंदील असल्यामुळे विजेची होणार बचत

इचलकरंजी : संजय आंबेे

दि. ०१ नोव्हेंबर ः दिवाळी हा सण सर्वत्र मोठया आनंदाने साजरा केला जातो, दिवाळी म्हणजे अंगणात पणती लावून सुबक रांगोळी काढून सजावट. त्याचबरोबर घराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृतीचे आकाशदीवे लावले जातात. प्रत्येकांचे घर उजळते ते आकाशकंदीलमुळे त्यामुळे दिवाळी सणाचा आकर्षण म्हणजे आकशकंदील हे आकाशकंदील पारंपारिकरित्या बांबूच्या कामटया व रंगीत कागदापासून तयार केले जात असतात पण अलिकडील काळात पारंपारिक आकाशकंदिलाची परंपरा कमी होत असल्याचे दिसत असून प्लॅस्टीकचे व चीनी कंपनीची आकाशकंदिले बाजारात आली आहेत या सर्वांवर उपाय म्हणून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक व नैसर्गिक स्त्रोताचा वापर करीत सौरउर्जेवरील आकाशकंदील तयार केले आहेत.दीवाळी सणाचे औचित्य साधत डीकेटीईच्या आयईईई स्टुडन्ट ब्रांच व एआयसीटीई आयडिया लॅब अंतर्गत इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविले सौरउर्जेवरील आकाशकंदील ‘सोलारवाली दिवाळी’ या उपक्रमांतर्गत बांबूपासून सौरउर्जेवरील पारंपारिक आकाशकंदील बनविले आहे.

याचे वैशिष्ठय म्हणजे हे हुबेहुब पारंपारिक आकाशकंदील सारखे दिसतात आणि बनविण्यास ही सोपे आहे. हे आकाशकंदील नैसर्गिक स्त्रोत्रावर म्हणजे सौरउर्जेवरील असल्यामुळे हे कंदील ८ तास सौर उर्जेमध्ये चार्जिंग केल्यास २ ते ३ दिवस स्वंयचलित प्रज्वलीत होतात यामुळे सर्वसामन्यांची विजेची बचत होणार आहे. हे कंदील पूर्णपणे पारंपरिक असून स्वदेशी बनावटीच्या साहित्यापासून बनविलेले असून या कंदीलासाठी केवळ ३०० रुपये खर्च अपेक्षित असून ग्राहकांना परवडेल अशा कमी किमतीत व दिसायला सुबक बनविलेले आहेत तसेच याचा प्रकाश जास्त पडत असल्यामुळे यामुळे दिवाळी सणाचा आनंद द्विगणीत होणार आहे.मागील वर्षीच्या दिवाळीसाठी देखील विद्यार्थ्यांनी सौरउर्जेवरील पणत्या तयार केल्या होत्या ते सोलर दिवे आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
विद्यार्थ्यांनी १०० सोलर अकाश कंदील बनविले असून या दिवाळीचे हे आकाशकंदील आकर्षण आहेत. आशिष पंजवाणी, संदेश पंतोजी, ज्ञानदा मिरजकर, उम्मेमिस्बाह भिस्ती, पंकज नलावडे, मेधावी पाटील, अमृता मुळे, मिस्बा बेटगरी, आशुतोष धनलशन्ख, अनुजा पिसे, विश्‍वजा कोलखुम्बे, ऐश्‍वर्या आडके, सुहास शिखरे, प्राची वर्खल नेहा भस्मे, प्रतिक्षा चौगुले, धनश्री निकम, सबीर संदे, अजित जाधव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर व्ही केतकर,मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या. आकाशकंदील तयार करण्यासाठी संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, डॉ सौ. एल.एस.आडमुठे डॉ आर.एन.पाटील, प्रा.डी.जी. पाटील, प्रा. एस.ए.वडेकर व प्राध्यपकांचे मार्गदर्शन लाभले.