न्यू इंग्लिश स्कूल कबनूर येथे 1996-97 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

कबनूर :हबीब शेख दर्जी 

दि.१८ : ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दि न्यू इंग्लिश स्कूल, कबनूर येथे सन १९९६-९७  च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम१७  मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमास विद्यालयाच्या माजी सहशिक्षिका व विद्यमान संस्थाचालक माननीय सौ. संगीता हिरगुडे-कोकाटे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच श्री. बागेवाडी सर व श्री. भारत कांबळे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती माधुरी पाटील मॅडम होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सौ. कांचन जाधव, सौ. शैलजा कांबळे, सौ. आसमा मुल्ला, सौ. सविता लोहार, सौ. लक्ष्मी कांबळे, उद्योगपती श्री. महादेव पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीकांत सागरे, श्री. जावेद मुजावर आणि श्री. युवराज सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.
स्नेहमेळाव्यात भावनिक आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले. विद्यार्थ्यांनी विद्यालय व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख पाहुण्या सौ. संगीता हिरगुडे-कोकाटे मॅडम यांनी माजी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत विद्यालयाशी नाळ कायम जोडून ठेवण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी पाटील मॅडम यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधा वाढविणे, नावलौकिक वृद्धिंगत करणे आणि सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवींद्र लाटकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार सौ. आसमा मुल्ला, सौ. लक्ष्मी कांबळे आणि श्री. राहुल गुरव यांनी केला. तर सहशिक्षक श्री. भारत कांबळे सर यांनी आभार मानले.या स्नेहमेळाव्यास सन१९९६-९७  बॅचमधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.