इचलकरंजी: विजय मकोटे
दि. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणा-या 68 वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह निमित्त आर्य चाणक्य पतसंस्थेच्या प्रधान कार्यालय आवारात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार भारतीचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. जवाहरजी छाबडा यांचे हस्ते सहकार ध्वंजाचे ध्वजरोहण करणेत आले.
कार्यक्रमाची सुरवात भारतमातेच्या प्रतिमापुजनाने झाली त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष व सहकार भारतीचे जिल्हा प्रमुख श्री. जवाहरजी छाबडा यांनी प्रास्ताविक केले नंतर संस्थेचे संचालक श्री. पंडीत ढवळे यांनी सहकार गीत, तसेच श्री. चितांमणी पारीशवाड यांनी सहकार प्रतिज्ञा सांगीतली. सदर कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र राशिनकर कार्यकारी संचालक श्री. जगदीश जोशी, संचालक श्री. शांतिनाथ शिरगावे, श्री. राकेश अग्रवाल तसेच शाखा सल्लागार श्री. सुदर्शन खाडे, डॉ. विनायक मेथे, श्री. हिरालाल उमरानिया, श्री. केशव कोडस्कर व संस्थेचा सर्व सेवक वर्ग उपस्थित होता.