शरद इन्स्टिट्युटच्या १० विद्यार्थ्यांची इन्फोसिस कंपनीत निवड

यड्राव: राम आवळे

दि.१८: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या दहा विद्यार्थ्यांची इन्फोसिस या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर, आर्टिफिशय इंटेलिजेन्स अॅण्ड डाटा सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.

कंपनीत कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग प्रज्ञा कुटवाडे, श्रुतिका निर्मळ, धुहिता नायक, प्रणोती सामणगांवकर, गुरुदेवी मेदली, स्मृती पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर विभागातील प्रशस्ती करंदीकर, सानिया मुजावर, सानिका उपाध्ये, आर्टिफिशय इंटेलिजेन्स अॅण्ड डाटा सायन्समधील स्नेहल पवार विद्यार्थ्यांची निवड झाली. इन्फोसिस हि कंपनी देशातील दुस-या क्रमांकाची मल्टीनॅशनल आयटी कंपनी आहे. जी बिझीनेस कन्सल्टींग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑउटसोर्सिंग सर्व्हिसेस कंपनी आहे.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अंतर्गत ग्रुप डिसंक्शन, इंटरव्यू टेक्नीक्सचा सराव, पर्सनॅलिटी डेव्हलेपमेंट, इंटरपर्सनल स्किल्स, मॉक इंटरव्हय्य यांची तयारी करुन घेतली जाते. तसेच जापनिज, फ्रेंच, पायथॉन, सी, सी++ अशा विविध भाषांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच कंपनीपूरक प्रशिक्षण दिले जाते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना या कॅम्पस इंटरव्यूसाठी झाला.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर,एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. बी. बी. संगमे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा प्रसुन, डिन प्रा. ए.बी. जाधव, डॉ. विद्या पाटील, प्रा. प्रियाका कबाडे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.