एस टी कर्मचाऱ्यांचा संप लवकर मिटवा

वारकरी साहित्य परिषदेच्या-धर्मराज जाधव यांची मागणी

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
   दि20 नोव्हेंबर  : एसटी आणि वारकऱ्यांचे नातं हे वेगळा असून सरकारने यात तातडीने लक्ष घालून हा संप लवकर मिटवावा असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे इचलकरजी शहराध्यक्ष श्री धर्मराज जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील एसटी कामगार आपल्या मागण्या साठी गेल्या दहा दिवसापासून काम बंद आंदोलनात उतरले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील एसटीची चक्रे थांबली आहेत याचा परिणाम नुकत्याच झालेल्या पंढरपूर कार्तिकी वारी वेळी पहावयास मिळाला पंढरपुर वारी साठी वाडी वस्ती ,गावोगावी, तसेच शहरात पर्यंत पोचून एसटी वारकऱ्यांना घेऊन येत असते .पण यावर्षी एसटी बंद असल्याने वारकऱ्यांना आपल्या विठोबाला भेटण्यासाठी येता आले नाही.
आज श्री धर्मराज जाधव यांनी इचलकरंजी एसटी आगारात जाऊन आंदोलनात उतरलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत हा संप मिटण्यासाठी दोन्ही बाजूने समन्वयाने तोडगा काढावा असे आव्हान करीत वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष ह भ प श्री विठ्ठल पाटील (काकाजी) यांना विनंती करून त्यांनी राज्यातील वारकरी संप्रदायाची एकजूट एकत्र करून एसटी कर्मचारी संप मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करणार असल्याचे श्री जाधव यांनी स्पष्ट केले . तसेच एसटी पुन्हा वारकऱ्यांना घेऊन लवकरच पंढरपूरला धावेल अशी आशाही व्यक्त केली.
यावेळी इचलकरंजी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.