श्री आदिनाथ बँकेच्या वार्षिक सभेमध्ये १० % डीव्हीडंड जाहिर चेअरमन बाळासाहेब चौगुले

इचलकरंजीःविजय मकोटे 
येथील श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी या बँकेची सन २०२५-२६ सालाची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, तांबे माळ, इचलकरंजी येथे खेळीमेळीत पार पडली.सुरूवातीस आद्यतिर्थकर आदिनाथ भगवान व संस्थापक स्व. आप्पासो मगदूम यांचे फोटोचे पुजन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन सुरूवात झाली.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संचालक श्री. श्रेणिक दादासो मगदूम यांनी केले. तर श्रध्दांजली ठराव संचालक श्री. मधुकर देवाप्पा मणेरे यांनी मांडला.
अहवाल वाचन युवा संचालक मा.श्री. राजू उर्फ अभयकुमार मगदूम यांनी केले. यामध्ये बँक आर्थिक दृष्या सक्षम व चांगली म्हणेज आरबीआय निकष-FSWM निकष पुर्तता करते तसेच कोअर बॅकींग सिस्टीम, डिझीटल व्यवहार, एटीएम, मोबाईल बँकींग, पॉझ व ई-कॉम, युपीआय / क्युआरकोड पेमेंट सुविधा देत असून नुकताच आरबीआय मार्गदर्शक तत्वांनुसार सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सायबर सिक्युरिटी आपरेशन्स सेंटर-सी-सॉक ही धोक्याबाबत सुरक्षेवरती आधारीत मॉनिटरीग सिस्टीम कार्यान्वित केलेली आहे. तसेच विविध शासकीय कर्ज योजना जसे आण्णासाहेब पाटील अर्थसहाय्य, पंतप्रधान सूर्यघर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी योजनांचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. जागतिक युध्द, तेलाचे भाव, वाढती महागाई, सायबर फ्रॉड संचालक कालावधी १० वर्षे इ. आव्हाने असेलचे नमुद केले.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन मा. बाळासाहेब पारीसा चौगुले यांनी १०% डिव्हीडंड जाहिर केला. तसेच अहवाल सालातील बँकेच्या कामकाजात मदत केलल्या सर्वाचे धन्यवाद व आभार मानले.
तदंनतर नोटीस वाचन मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. जयकुमार उपाध्ये यांनी केले. सभासदांनी सर्व विषयास एकमताने मंजूरी दिली. तसेच मार्गदर्शन भाषणात मा. श्री. स्वप्नीलजी आवाडे यांनी कामकाज चांगले असलेचे व आदिनाथ टिम चांगली व सक्षम असलेचे नमूद करून कर्जवाटप वाढवून सीडी रेशो वाढविणेची सुचना करून नफा वाढेल, पर्यायाने कॅपिटल वाढेल असा संदेश दिला. बँकेस ३१ वर्षे झाली असलेने बँक अधिकारी व संचालकांच्या अनुषंगाने सक्सेशन प्लानिंग करावे अशीही सुचना केली.
विशेष अतिथी म्हणून आदरणीय मा.श्री. प्रकाश आवाडे (आण्णा) यांनी बँकेचा कारभार उत्तम असून सर्वांचे अभिनंदन करून नवीन शासकीय कर्ज योजना राबवून उद्योजक तयार करा असा संदेश दिला. बँकेच्या पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या.
सभेमध्ये मंचावरील उपस्थितीत मान्यवरांचा विशेष सत्कार करणेत आला. जवाहर कारखान्यास पुरस्कर मिळालेने मा. प्रकाश आवाडे (आण्णा) यांचा तर प्रमुख अतिथी म्हणून मा. स्वप्नीलजी आवाडे व सौ. वैशालीताई आवाडे यांचा सत्कार करणेत आला. कोरोची जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल मा. सानिका पाटील आवाडे यांचा तर जनकल्याण राज्य सन्मान पुरस्कार-२०२६ प्राप्त झालेने संचालक मा.श्री. मधुकर मणेरे व मा.श्री. नितीन काडाप्पा यांचा तर मुख्यमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीमध्ये सह अध्यक्षपदी निवडीबद्दल संचालक मा.श्री. श्रेणिक मगदूम यांचा सत्कार करणेत आला. तसेच आदर्श ग्राहक म्हणुन श्री. हुसेनबादशहा मुल्ला तर आदर्श कर्मचारी म्हणून श्री. प्रशांत बरगाले यांचा सत्कार करणेत आला. तसेच उत्कृष्ठ शाखा म्हणून शाखा कबनूर या शाखेस रक्कम रु.११,०००/- व शिल्ड देणेत आले. बँकेच्या २५ वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये वार्षिक सभेमध्ये निरंतर उत्तम सादरीकरण व सुत्रसंचालक म्हणून मा.श्री. तिर्थकर माणगांवे यांचा विशेष सत्कार करणेत आला.
शेवटी व्हा. चेअरमन चंद्रकांत मगदूम यांनी सभासदांना सर्व विषयास मंजूरी दिल्याने व आवाडे परिवाराचे बँकेस कायमपणे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले.
सदर सभेस संचालक मा.श्री. सुभाष काडाप्पा, कुंतिलालजी पाटणी, सुदर्शन खोत, अनिल बम्मण्णावर, श्री. संपत कांबळे, गुरुनाथ हेरवाडे, सुचित हेरवाडे, तसेच संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले, बीओएम सदस्य उमेश कोळी, अनिल कुडचे, शितलकुमार चौगुले तसेच माजी चेअरमन बाळासो सिध्दाप्पा चौगुले, शंकर हजारे, जिनेंद्र खोत, दादासो मगदूम, शांतीनाथ मगदूम, रविंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश चौगुले, शिवाजी पाटील, सतिश मगदूम, अशोक पुजारी, बाबू सग्गे, प्रधान माळी, मोहन चौगुले, सीईओ जयकुमार उपाध्ये सीएओ जिवंधर चौगुले असि. सीईओ निलेश बागणे व संतोष रायनाडे उपस्थित होते.
सभेचे सुत्रसंचालन श्री. तिर्थंकर माणगांवे यांनी केले.