शहापूर पोलिसांची कारवाई : २ किलो २८१ ग्रॅम गांजासह तिघे जेरबंद

इचलकरंजी: विजय मकोटे 
दि.११ : शहापूर  पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघा संशयितांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे २ किलो २८१ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल हँडसेट असा एकूण २ लाख ३४ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरची (ता. हातकणंगले) येथील चव्हाणवाडी टेकडी परिसरात गांजाची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार रोहित डावळे यांना मिळाली होती. त्यानुसार शहापूर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.आरोपींकडून ५७,२२५ रुपये किमतीचा २ किलो २८१ ग्रॅम गांजा, १ लाख २० हजार रुपये किमतीची आय क्यूब मोपेड दुचाकी आणि ५७ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण २,३४,२२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क) व २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अरविंद उर्फ राजवीर सुरेंद्र सिंह (वय २४), मोहसीन इर्शाद सनदी (वय २४) आणि सार्थक श्रीप्रसाद बिंद (वय २०) यांचा समावेश आहे. यापैकी एका आरोपीवर यापूर्वीही अमली पदार्थासंदर्भातील गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मा. अप्पर पोलीस अधिक्षक, गडहिंगलज  विभाग कॅम्प इचलकरंजी, श्री आण्णासाहेब जाधव साो, मा. अप्पर पोलीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, इचल. विभाग श्री. विक्रांत गायकवाड याचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र लोहार, पोउनि श्री महावीर कुटे, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, उदय पाटील, रोहित डावाळे, अर्जुन फातले, शशिकांत ढोणे, सतिश कुंभार, बबन माळी, गजानन कोष्टी, संतोष जाधव आदी पोलीस कर्मचारी यांनी केली

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण देवरकर करीत आहेत.