इचलकरंजी: विजय मकोटे
दि१९: नव्या रंगात व नव्या ढंगातील स्पर्धा अन् मनाेरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असलेला आणि स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ बनलेला इचलकरंजी फेस्टिव्हल २०२६ यंदा नाट्यगृह नुतनीकरण कामामुळे भरविण्यात येणार नाही, अशी माहिती इचलकरंजी फेस्टिव्हलच्या संयाेजिका साै. माेश्मी आवाडे यांनी दिली.
गणेशाेत्सव आणि इचलकरंजी फेस्टिव्हल हे मागील ३० वर्षांपासून एक समीकरणच बनले आहे. पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर माजी वस्त्राेद्याेग मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी फेस्टिव्हलची सुरुवात करुन स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळून दिले आहे. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून शहर व परिसरातील अनेक कलाकारांनी उत्तुंग भरारी घेत इचलकरंजी शहराच्या नांवलाैकिकात माेलाची भर घातली आहे. आता आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखालीर दरवर्षी हा फेस्टिव्हल साेहळा श्रीमंत ना. बा. घाेरपडे नाट्यगृह याठिकाणी भरविला जाताे. परंतु, यंदा या नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असलेने यंदाचा फेस्टिव्हल कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आला आहे.
अनंत चतुर्दशी दिनी (२५ सप्टेंबर) झेंडा चाैक याठिकाणी इचलकरंची फेस्टिव्हलच्या वतीने सार्वजनिक विसर्जन मिरवणूकीत सहभागी हाेणाèया गणेश मंडळांना मानाची पान-सुपारी देण्याचा कार्यक्रम हाेणार आहे, असेही साै. आवाडे यांनी सांगितले. यावेळी शेखर शहा, अहमद मुजावर आदी उपस्थित हाेते.