कबनूर : हबीब शेखदर्जी
दि २ : कबनूर येथील ‘कबनूरचा दगडूशेठ नवसाचा गणपती – सत्यराज ग्रुप, कबनूर’ या मंडळाच्या श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला.
श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना माजी उपसरपंच श्री. निलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने श्री. निलेश पाटील यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी श्री. कुंदन आवळे, श्री. विकास फडतारे, श्री. धनाजी धनगर, श्री. रवी धनगर, श्री. आनंदा धनगर यांच्यासह अन्य मान्यवर, माता-भगिनी, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.