कबनूर: हबीब शैखदर्जी
दि .४: केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने विविध ऑनलाइन पोर्टल व सेवा केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत. सहारा डिजिटल ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून कबनूर व पंचक्रोशीतील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध शासकीय योजनांचा व ऑनलाइन सेवांचा लाभ मिळत आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती हातकणंगलेचे सदस्य प्रकाश पाटील यांनी केले.सहारा डिजिटल ई-सेवा केंद्र, कबनूरच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या वैशाली कदम होत्या.
यावेळी पंचायत समिती हातकणंगलेचे माजी सदस्य प्रमोद पाटील, उपसरपंच सुधीर लिगाडे, माजी उपसरपंच प्रदीप मनेरे व निलेश पाटील, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमोल पाटील, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बबनराव केटकाळे, माजी सरपंच सुधीर पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य दादा पाटील, पंचायत समिती हातकणंगलेच्या माजी सभापती रेश्मा सनदी, माजी ग्रामपंचायत सदस्य पापालाल सनदी ,श्री समर्थ पेट्रोल पंपाच्या मालक सौ. अनिता गभाले आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच महंमद पाशा, सागर सराटे, अनिल परीट, सिद्धार्थ इंगवले, सुनील काडाप्पा, अल्ताफ मुल्ला, अनिल पाटील, प्रकाश आवटे, किशोर पाटील, आप्पासाहेब पाटील, अल्ताफ मुजावर, पत्रकार सुरेश कुंभार, राजेंद्र जगदेव, कबनूर ग्राम महसूल अधिकारी प्रतीक जाधव, कोतवाल शिवाजी चव्हाण, अंगणवाडी सेविका सपुरा शेखजी, जमीर सनदी, सचिन सुतार, महेश कांबळे, जावेद इनामदार, राजेंद्र केटकाळे ,रहीम शेख,लखन जमादार, बुधगोंद बिरंजेयांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व शासनाच्या विविध सेवांचा लाभ अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहे.कार्यक्रमाचे स्वागत रिजवाना मकानदार यांनी केले, तर आभार युसूफ मकानदार यांनी मानले. नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उद्घाटन सोहळा आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.