श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर रंगली स्पर्धा

जिल्हास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेेच्या तिन्ही गटात गंगामाई चा डंका

इचलकरंजी : विजय मकोटे 
दि १५ : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत यजमान श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलने तिन्ही वयाेगटात प्रथम क्रमांक पटकावून हॅटट्रिक साधली आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय काेल्हापूर, व इचलकरंजी महानगरपालिका आयाेजित व श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेच्या मुख्याध्यापिका साै. विद्या लाेटके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संजय शेटे  व क्रीडा संघटक प्रा. शेखर शहा उपस्थित हाेते.


स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे – १४  वर्षाखालील मुली गट : प्रथम – श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर काॅलेज, द्वितीय – रवींद्रनाथ टागाेर विद्यानिकेतन, तृतीय – मराठी मिडीयम हायस्कूल. १७  वर्षाखालील मुली गट : प्रथम – श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड जुनिअर काॅलेज, द्वितीय – दिशा इंग्लिश मिडीयम स्कूल, तृतीय – मराठी मिडीयम हायस्कूल. १९  वर्षाखालील मुली गट : प्रथम – श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर काॅलेज, द्वितीय – डीकेटीई इंग्लिश मिडीयम ज्युनिअर काॅलेज, तृतीय – इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर काॅलेज.
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका साै विद्या लाेटके,उपमुख्याध्यापक श्री एस एस काेळी , उपप्राचार्य साै स्नेहा कवळेकर ,पर्यवेक्षिका हेमांगी संकपाळ, पर्यवेक्षक विकास कांबळे, ज्येष्ठ शिक्षक डी.डी काेळी यांनी विजयी संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले. नंदराज पवार, क्रीडा शिक्षक संभाजी बंडगर, सुहास पवळे, तुषार जगताप, गावडे,  पंच म्हणून साजिद मुजावर, इब्राहिम मुजावर, मुन्सिा मुजावर, राेजा कलावंत, शिवानी कागले यांनी पंच म्हणून काम पाहिले.