उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृ‌शोक

नांदणी :  राम आवळे 

दि .१५:  चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे चेअरमन उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचे वडील बाळासाहेब गणपती चकोते यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी दुःखद निधन झाले.प्राथमिक शिक्षक म्हणून ३६ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले होते.अत्यंत मितभाषी, मायाळू व मनमिळावू स्वभावामुळे ते आप्पाजी या नावाने परिचीत होते. शेवटपर्यंत त्यांनी शेती व शिक्षण क्षेत्राला स्वताला वाहून घेतले होते , कै गणपती आण्णा चकोते चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चकोते इंग्लिश स्कूल अत्यंत उत्कृष्टरित्या, नावारूपाला आणले आहे.चकोते स्कूलचे संचालक म्हणून कार्यरत होते.स्कूलच्या लहान मुलांमध्ये दिवसभर रमुन जात असत, सर्व विद्यार्थी मध्दे सुद्धा ते आप्पाजी म्हणूनच ओळखले जात होते. त्यांच्या दुखद निधनामुळे चकोते परिवार, चकोते उद्योग समूह व नांदणी परिसरात शोक पसरला आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले, सुना ,मुलगी, जावई,नातवंडे असा परिवार आहे.