इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.१५: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त राहुल मर्ढेकर यांच्या हस्ते आणि शिक्षण अधिकारी बी.एम.कासार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.तसेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करणेत येत असल्याने महानगर पालिकेच्या रविंद्रनाथ टागोर वाचनालय येथेडॉ. कलाम यांच्या जीवण चरित्राचे सामुदायिक वाचन करून वाचन प्रेरणा दिवस साजरा करणेत आला.
याप्रसंगी सहा.आयुक्त सुनिल शिंदे, सहा आयुक्त रामचंद्र कांबळे, सहा.आयुक्त नितिन बनगे, नगरसचिव राहुल पोटे, भांडार अधिक्षक गणेश शिंदे, उद्यान व वनसंवर्धन विभाग प्रमुख प्रशांत आरगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, ग्रंथपाल बेबी नदाफ, संदीप जोशी, सदाशिव जाधव, आयुब शेख, युवराज भोसले , राहुल राजापुरे, इर्शाद मोमीन, हर्षद गायकवाड,पायल खरे, महादेव देसाई, सचिन शेडबाळे, विकास कांबळे, विद्या कुंभार, आदींसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.