शहापूर पोलीस ठाण्यातला पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

दाखल गुन्हातील तपासकामी मदत करतो म्हणून मागितली होती 4 हजाराची लाच

कोल्हापूर :प्रतिनिधी

 दि : ३० डिसेंबर इचलकरंजी शहरातील शहापूर पोलीस ठाण्यात कायर्रत असलेला पोलिस कॉन्स्टेबल याला  4 हजारची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. पांडुरंग लक्ष्मण गुरव ( पो ना.१३३५ )असे ताब्यात घेतलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
यातील तक्रारदार व त्याचे आई विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास संशयित आरोपी पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग गुरव (सध्या रा. हळदकर बंगला, गोंजारी हॉस्पिटलशेजारी,खानापूर, ता. भुदरगड) कर करत  होता  तपासात मदत करणेसाठी गुरवने 4 हजार लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करणेत आली होती. त्यानुसार आज सापळा रचून पांडुरंग गुरव याला चार हजारची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सफौ. संजीव बंबरगेकर, पोहेकॉ. अजय चव्हाण, पोना. विकास माने, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम, पोकॉ मयूर देसाई या पथकाने ही कारवाई केली.