निमशिरगांव येथे शरद अभियांत्रिकेचे श्रम संस्कार शिबिर

राष्ट्रीय सेवा योजना : श्रमदान, प्रबोधनाचे विविध कार्यक्रम

यड्राव : विजय धंगेकर

दि १ जानेवारी यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त) आणि निमशिरगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये श्रमदान, वृक्षारोपन, पथनाट्य, जनजागृती, प्रकल्प प्रात्यक्षिके आदी सामाजिक उपक्रम होणार आहेत. मंगळवार (ता.28) रोजी सकाळी 10 वाजता संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होईल. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. आश्विनी गुरव आहेत. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, उपप्राचार्या सौ. एस. पी. कुर्लेकर, अनिल पाटील, कलगोंडा पाटील, अजित सुतार, शितल पाटील, महावीर पाटील, पद्माकर पाटील, संदीप साजणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत राहणार आहेत.
सोमवार (ता.3) रोजी दैनंदिन कार्यक्रम व सांगता समारंभ होईल. संस्थेचे अध्यक्ष नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते समारोपाचा कार्यक्रम होईल. यावेळी अध्यक्षस्थानी उपसरपंच ईश्वरा धनवडे आहेत. यावेळी सुनिल पाटील, अविनाश पाटील, सुधाकर पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत राहणार आहेत. शिबिराचे नियोजन प्रकल्प अधिकारी प्रा. व्ही. एस. वाडकर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह ग्रामपंचायत निमशिरगांव हे करीत आहेत.