यशस्वी करिअरसाठी ‘शरद इंजिनिअरिंग’मध्ये विविध कौशल्ये

अनिल बागणे : प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

यड्राव,: प्रतिनिधी

 दि 1 जानेवारी.  जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो. तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निग, अॅक्टीव्हिटी प्रोग्रॅम, प्रोडक्शन सेंटर याच्यासोबत २८ प्रकारचे अद्यावत कौशल्ये उपलब्ध आहेत. ज्याचा उपयोग स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी, चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर पायथॉन, सी लँग्वेज, जावा यासारखे अद्यावत लँग्वेजचे प्रशिक्षण देण्यात येते. या सर्वामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळणार आहे.” असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते.

श्री. बागणे म्हणाले, ”विद्यार्थी कारखानदार बनला पाहीजे या उद्देशाने महाविद्यालयामध्ये’स्टार्टअप सेंटर’ची उभारणी करण्यात आली आहे. ज्याचा उपयोग विद्यार्थी, कारखानदार,नवउद्योजक यांना होत आहे. त्याचबरोबर इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून अद्यावत कौशल्य अवगत होणार आहे. तसेच जीवनात यशस्वीतेसाठी शॉर्टकट नाही, प्रामाकणिकपणा व प्रचंड कष्ट आणि त्याचबरोबर व्यक्तीमत्वातील नम्रता हे गुण अंगीकारला तर यश हमखास मिळतं. शिक्षण संस्था ह्या फक्त शिक्षणाचीच मंदिरे नसून ती संस्काराचीही मंदिरे आहेत. हा संदेश शरद पॅटर्न देतो. प्रत्येकाने आपल्या आई, वडील व शिक्षकांचा आदर राखला पाहीजे. ”

दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, उपप्राचार्या एस.पी. कुर्लेकर, प्रा. प्रविण यादव यांनी महाविद्यालय व विभागाची माहीती दिली. यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपप्राचार्या सौ. एस. पी. कुर्लेकर, डिन एस.डी. पाटील, प्रा. पी.एच. यादव, प्रा. यु. एम. मुलाणी, डॉ. एस.पी. पाटील, प्रा. एस.व्ही. कुंभार, प्रा. के.ए.कुपाडे, प्रा. मंगेश कुलकर्णी याच्यासह विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थीत होते.

स्वागत प्रथमवर्ष विभागप्रमुख डॉ. अमित बागडे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल सुर्यंवशी, माधुरी जाधव यांनी केले. आभार प्रा. उमेश सिध्दार्थ यानी मानले.