कडवई :-मुजीब खान
आँगस्ट २०२१मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. शाळा तुरळ सुवरेवाडी शाळेचा निकाल १००% लागला आहे.
या शाळेतील विद्यार्थी कु.रोशन विजय कुंभार याने या परीक्षेत ३०० पैकी २३२ गुण मिळवून रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत ६१ वा क्रमांक आणि संगमेश्वर तालुका गुणवत्ता यादीत ५ वा क्रमांक पटकावून सुयश मिळवले आहे. तसेच शाळेतील कु. आर्यन राजाराम शिगवण – २०० गुण आणि कु. कुणाल मनोहर तावडे – १३८ गुण
यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश मिळवले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील १००% निकालाची परंपरा शाळेने यावर्षीही कायम राखली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या यशाचे शिल्पकार व मार्गदर्शक संदिप कुंभार सर, पालकवर्ग, मुख्याध्यापिका सौ.दुर्गा भोजने मँडम, तुरळ
केंद्राचे प्रेरणास्थान केंद्रप्रमुख आत्माराम धुलप सर या सर्वांचा मोठा वाटा आहे. रोशन कुंभार याने शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश मिळवून तुरळ सुवरेवाडी शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे.
रोशन कुंभार, आर्यन शिगवण, कुणाल तावडे यांचे तुरळ केंद्राचे केंद्र प्रमुख धुलप सर, मुख्या. भोजने मँडम, कुंभार सर, तुरळ केंद्रातील सर्व शिक्षक,
कडवई बीटमधील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती शाळा तुरळ सुवरेवाडी आणि सर्व ग्रामस्थ तुरळ यांचेकडून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.