काॅग्रेसचे तरुण तडफदार नेते अनिरुध्द कांबळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

न्युज एडिटर रत्नागिरी :-मुजीब खान
कोरोना कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीना साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्स परिवाराच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धामणी येथे कोरोना योद्धा पुरस्कार सम्मान सोहळा पार साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्स परिवार आयोजित या कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार सोहळयात काॅग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेते अनिरुध्द कांबळे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना कालावधीत अनिरुद्ध कांबळे यांनी समाजातील अनेक गरजूना मदतीचा हात दिला होता.कोरोना कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील अनेक गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य व आर्थीक मदत त्यांनी केली होती त्यांच्या कामाची दखल महालक्ष्मी टाइम्स साप्ताहिक परिवाराकडुन घेण्यात आली व कोरोना योद्धा सन्मान पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी निवृत्त वायुसेना अधिकारी पुणे आर बी पाटील,प्रमुख पाहुणे संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम उपस्थित होते तसेच शिवसेना नेते राजेंद्र महाडिक,रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राजेंद्र सुर्वे,सामाजिक कार्यकर्ते युहुत्सु आर्ते,साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्स संस्थापक संपादक फिरोज शेख, महालक्ष्मी टाइम्स रत्नागिरी जिल्हा न्युज एडिटर मुजीब खान,कडवई जिल्हा परीषद उमेदवार संतोष थेराडे,कॅप्टन हनिफ खलफे, मजीद नेवरेकर,साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्स परिवाराचे सर्व पत्रकार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.