iसंगमेश्वरात महाविकास आघाडीचे चक्का जाम आंदोलन

संगमेश्वर :- धनंजय भांगे

दि: २७ जानेवारी संगमेश्वर येथे बस स्थानक का समोर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण असलेल्या चौपदरीकरणाच्या कामा विरोधात आज संगमेश्वरात महाविकास आघाडीच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेसह राष्ट्रवादी सहभागी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध.जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने, तालुका प्रमुख प्रमोद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.


या आंदोलन ना वेळी संगमेश्वर येथील पोलिस निरीक्षक उदय झावरे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख व त्यांचे सहकारी बंदोबस्त तैनात केला होता .अशा रीतीने हे आंदोलन पार पडले