इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. २७-जानेवारी येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगली रोड येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
इचलकरंजी येथील DKTE मधील आजगावकर लायब्ररीमध्ये गेली १५ वर्षे कार्यरत असलेले बौद्धिक अक्षमता श्रेणीतील राष्ट्रीय रोल मॉडेल व राष्ट्रपती विजेते श्री प्रथमेश दाते प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांच्या हस्ते ध्वज फडकवून आजचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी यावेळी घेण्यात आली होती. प्रमुख पाहुणे श्री प्रथमेश दाते यानी संस्थेने ध्वजवंदनाची संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. या प्रसंगी अध्यक्ष श्री जवाहर छाबडा यानी प्रमुख पाहुणे श्री प्रथमेश दाते यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. श्री प्रथमेश दाते यानी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करुन मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेच्या सर्व संचालकानी त्यांचे व त्याना घडविणाऱ्या पालकांचे कौतुक केले व त्याना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष श्री राजेंद्र राशिनकर,संस्था संचालक, सल्लागार व निवडक कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी श्री अरविंद कुलकर्णी यानी प्रमुख पाहुणे श्री प्रथमेश दाते यांचा परिचय करुन दिला.