इचलकरंजी :प्रतिनिधी
दि र७ जानेवारी लोटस इंग्लिश मिडीयम स्कूल,इचलकरंजीच्या वतीने २६ जानेवारी २०२२ हा ७३ वा प्रजासत्ताक दिना निमित्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे माजी उपसभापती महिला व बाल कल्याण समिती, मा. सौ. सुजाता कोरे मॅडम यांच्या हस्ते भारतमातेचे फोटो पूजन करून मा. श्री. मल्लिकार्जुन कोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सामुदायिक जन-गण-मन चे गायन करून देशभक्तीपर गीते व विद्यार्थ्यानी भाषणे केली. उपस्थित विद्यार्थी, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मिठाई वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्कूलच्या को-ओडीनेटर सरला दिवटे मॅडम सूत्रसंचलन शिक्षिका स्मिता सौदत्तीकर मॅडम यांनी तर आभार शिक्षिका अर्चन केंगार मॅडम यांनी मानले.
ध्वजारोहण कार्यक्रमास, रुपाली शिंदे मॅडम, योगिता कोष्टी मॅडम, तैजुम मुजावर मॅडम, तुषार कांबळे, शांता कोष्टी आदी उपस्थित होते.