ईस्ट मँचेस्टर सोसायटी व ग्रामीण रोटरीच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा

इचलकरंजी -प्रतिनिधी

दि:२८ जानेवारी येथील ईस्ट मॅचेस्टर होम्सच्या व आर. सी. सी. ईस्ट मँचेस्टर ग्रामीण रोटरी यड्राव यांच्यावतीने देशाचा 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्योजक चेतनजी चौधरी यांचे हस्ते तसेच राकेश पाटील आणि प्रकाशराव सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी  श्री. चौधरी यांनी, परिसरातील विकासकामांना संस्थेच्या मान्यवरांचे सहकार्य असून आम्हीही त्यास मदत करीत असल्याचे सांगितले. तर राकेश पाटील यांनी, या परिसराचा जलद गतीने विकास करू अशी ग्वाही दिली. प्रकाशराव सातपुते यांनी सोसायटीमध्ये होत असलेल्या झेंडावंदनामुळे रहिवाशांमध्ये एकोपा निर्माण होत असून सर्वजण एकीने या कार्यक्रमात सहभागी होत असलेचे सांगितले. पुंडलिकभाऊ जाधव यांनी यथोचित मार्गदर्शन केले. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष विनोद काबरा व सचिव अरूण पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे नियोजन एस. बी. नवले, बाबुभाई, उत्तमसिंग राजपूत, सौ. आशा पाटील, सौ. हेमाजी सोगाणी, सौ. तेजस सातपुते, सौ. स्वाती पुजारी, देव पटेल, मेहतर यांनी केले. यावेळी विक्रम जाधव, निशीकांत मगदूम, डॉ. प्रशांत पाटील, दायमा, अमित दोशी, विष्णू व्यास, महेश झंवर, शितल पाटील, अभिषेक छप्रे, बोराशेठ, राजू दोशी, श्रेणिक पाटील, विवेक खोंद्रे, पवन पाटील, गजानन चौगुले, पुजारी, लखन दायमा, शाम भोसले इ. मान्यवर तसेच व रोटरीचे सदस्य आणि कॉलनीतील रहिवाशी हजर होते.