रत्नागिरी: मैहरूनिसा साखरतर
दि २९ जानेवारी :२५ जानेवारी रोजी संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे गाव पर्या खाली बेवारस बालिका सापडली होती . देवरुख पोलिसांनी तिच्या माता-पित्यांचा शोध लावण्यासाठी ठीक ठिकाणी पथक पाठवून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला . तीन दिवसात या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे .
कुवारा बाजारपेठ येथे राहणाऱ्या तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . सौ. सांची स्वरूप कांबळे ( वय २५ सध्या राहणार कुवारबाव बाजारपेठ , तालुका जिल्हा रत्नागिरी) असे तिचे नाव आहे तर तिला मदत करणारा मिथिल उर्फ मिथिलेश मदन डांगे (वय 23 राहणार हातखंबा ,डांगेवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी ) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे . त्यांनी २४ जानेवारी रोजी रात्री 11:30 वा पायरी गाव पऱ्यामध्ये बालिका ला टाकण्याचे कबूल केले आहे. त्या वरून त्यांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्क , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई रत्नागिरी, श्रीनिवास साळुंखे, माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी , लांजा , पोलीस निरीक्षक , श्री . बी . एस . जाधव ,पोलीस निरीक्षक, श्री .यु .जे. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, व्ही .डी . मावळणकर, एस .एस .भुजबलराव, एस. एस . सडकर, जे. जे . तडवी, पो .ना के .एम .जोशी ,पो .ना एस .डी . जाधव, पो शि. आर .आर .कांबळे, पो शि, डी .एम. मांढरे, या पथकाने आरोपी यांचा शोध घेऊन चांगली कामगिरी पार पाडली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हातून कौतुक करण्यात येत आहे.