इचलकरंजी :प्रतिनिधी –
दि ३१ जानेवारी येथील आसरानगर भागातील सुभाष भजनावळे यांचा चार वर्षीय मुलगा रंश भजनावळे हा जन्मजात थॅलेसिमिया मेजर या दुर्दम्य आजाराने ग्रस्त आहे. या आजारावर सध्या तरी उपचार नसला तरी या आजारातून मुक्तीसाठी अस्थिमज्जा प्रतिरोपण अर्थात बोन मॅरो हा पर्याय आहे. या शस्त्रक्रियेसाठी 15 लाख रुपयांचा खर्च असून त्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात मिळावा, अशी विनवणी सौ. रामेश्वरी सुभाष भजनावळे यांनी केली आहे.
थॅलेसेमिया मेजर हा अनुवांशिक आजार असून यामध्ये तांबड्या पेशीत असलेले हिमोग्लोबिन बाधित होते. हिमोग्लोबिन हे रक्तपेशींतील असे प्रथिन असते, ज्यामुळे प्राणवायू वाहून नेला जातो. असा दुर्दम्य आजार चार वर्षाच्या रंश भजनावळे याला जन्मापासूनच जडला आहे. या आजारामुळे त्याच्या शरीरात रक्त तयार होत नसल्यामुळे वयाच्या चार महिन्यापासून रंश याला दर महिन्याला वीस दिवसांच्या फरकाने दोन वेळा रक्त चढवावे लागते. सुभाष भजनावळे हे मजुरीकाम करत असल्याने त्यांना दर महिन्याला रक्त आणि औषधोपचारासाठी लागणारा खर्च न पेलवणारा आहे. त्यातूनही ते आपल्या मुलासाठी धडपडत आहेत.
या आजारावर नेमका उपचार सध्या उपलब्ध नसून एक तर आयुष्यभर रक्तलावणे हा तात्पुरता उपचार आहे. या आजारातून पूर्णत: बरे होण्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया करावी लागते. पण त्या शस्त्रक्रियेसाठी 15 लाख रूपये खर्च आहे. दरमहा खर्च आणि करावी लागणारी शस्त्रक्रिया महागडी आहे. ही शस्त्रक्रिया पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. शासन योजनेत या शस्त्रक्रियेचा समावेश नसल्यामुळे रंशच्या उपचारासाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यासाठी सर्वांनी मदतीचा हात द्यावा, अशी विनवणी रंशची आई रामेश्वरी भजनावळे यांनी केली आहे. मदतीसाठी जी पे/फोन पे 7840983886 अथवा रामेश्वरी सुभाष भजनावळे (करुर वैश्य बँक खाते क्र. 2118153000001952 IFSC – KVBL0002118) यावर आपली मदत पाठवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.