ईस्ट मँचेस्टर मधील स्पर्धाचा बक्षिस समारंभ संपन्न

इचलकरंजी  :प्रतिनिधी 
 दि: १ फेब्रुवारी येथील आरसीसी क्लब ऑफ ईस्ट मॅचेस्टर (ग्रामीण रोटरी क्लब) व ईस्ट .. होम्स मधील रहिवाशांच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचा बक्षिस वितरण समारंभ रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचे हस्ते व मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन इरगोंडा पाटील यांचे अध्यक्षतेखाली व मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. 
यावेळी प्रकाशराव सातपुते यांनी, परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सोबत बाल खेळाडूपासून महिलांपर्यंत अनेकांनी या स्पर्धामध्ये सहभाग घेवून आपल्या कलागुणांना वाव दिल्याचे नमुद करत असे उपक्रम सातत्याने राबवावेत असे आवाहन केले. याप्रसंगी विजेत्या मुली व महिलांना सौ. हेमाजी सोगाणी, सौ. आशा पाटील, सौ. सुरेखा मगदूम, सौ. सारीका पाटील, सौ. सुरेखा खोंद्रे, सौ. दिपाली कांदेकर, सौ. तेजस सातपुते, सौ. स्वाती पुजारी, सौ. सन्मती पाटील, सौ. पटेल, सौ. दायमा यांचे हस्ते तर मुलांना बाबुभाई, उत्तमसिंग राजपूत, देव पटेल, अरूण पाटील, विनोद काबरा, एस. बी. नवले यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
धावणे स्पर्धेत मोठ्या गटामध्ये वैष्णवी पाटील, शार्दुल खोंद्रे आणि लहान गटामध्ये जुई कांदेकर, दर्शन तर स्केटींगमध्ये देवांश जैन, स्वरा नवले, सायकल स्पर्धेमध्ये सक्षम नवले, मीत तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये ईशान सातपुते, सार्थक पाटील, भक्ती पाटील यांना प्रथम क्रमांक मिळविला. विविध स्पर्धांमधील तीस मुला-मुलींना बक्षिसे देणेत आली. स्पर्धांमध्ये शंभरपेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. कार्यक्रमास आर. सी. सी. क्लबचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.