कामगार नेते मिश्रीलाल जाजु यांची इचलकरंजी नगरपालिका निवडणूक भाजपा प्रभारी म्हणून निवड.

इचलकरंजी: विजय मेकाटे

दि: १ फेब्रुवारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी श्रीमंत “अ वर्ग” नगरपालिका असलेली इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुक प्रभारी पदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ जाणकार नेते, कामगार नेते मिश्रीलाल जाजु यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र मा.आम.प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या शिफारसीने भाजपा जिल्हा अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, तसेच भाजपा प्रवक्ते मा.खासदार धनंजय महाडीक, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव साने, मा.नगरसेवक सुनील साळुंखे, महेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थित त्यांना देण्यात आले.

यापूर्वीही मिश्रीलाल जाजु यांनी पक्ष विस्ताराचे काम जोरदारपणे केले आहे. त्याचबरोबर जुने कार्यकर्ते यांची फळी देखील त्यांच्या सोबत आहे. तसेच यापूर्वी इचलकरंजी नगरपालिकेचे मा.उपनगराध्यक्ष असलेने ते चांगलेच सर्वांचे परिचयाचे आहेत. याचा फायदा येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला होणार आहे. निवडणुकीच्या प्रभारी पदी अतिशय योग्य निवड झाल्याची चर्चा कार्यकर्ते व इचलकरंजीकरांमध्ये निर्माण झाली आहे. मिश्रीलाल जाजु यांचा पक्ष संघटनेमध्ये असलेला प्रभाव व पक्ष बांधणीमध्ये असलेला हातखंडा, तसेच कामगार वर्गामध्ये असलेली लोकप्रियता, शहराच्या प्रत्येक भागामध्ये लोकांशी -कार्यकर्ते यांच्याशी असलेला संपर्क याचा फायदा देखील भारतीय जनता पार्टीला होणार आहे. त्यामुळे त्यांची निवड योग्य मानली जात आहे.

इचलकरंजी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अॅड.अनिल डाळ्या यांनी यापूर्वीच इचलकरंजी नगरपालिका निवडणुक स्वबळावर लढवून निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन सर्व प्रभागामध्ये कमळ या चिन्हावर उमेदवार उभे करून नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार असलेचे सांगितले. मा.आम. सुरेश हाळवणकर यांनी केलेले १०७ कोटीचे रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट, ऑक्सिजन पार्क, सहवास कट्टे, ओपन जिम, बगीचे, शिवतीर्थाचे सुशोभिकरण, इचलकरंजी शहराला चोहोबाजूंनी जोडणारे रस्ते, सेफ सिटी अंतर्गत सी सी टीव्ही कॅमेरे यासर्व कार्याच्या जोरावर इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आणणार असलेचे या निवडी वेळी मिश्रीलाल जाजु यांनी सांगितले.