पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांकडून वरदविनायक नदी घाटाची स्वखर्चातून स्वच्छता

इचलकरंजी : संजय आंबे

दि ०१ फेब्रुवारीः पंचगंगा नदीतीरावरील इचलकरंजीचे आरध्य दैवत श्री वरदविनायक मंदीराशेजारी असणारा घाट हा जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापूरामध्ये नदीच्या पाय-यांवर हा गाळ येवून पडला होता. सदर घाटावर कोणतेही वाहन जात नसल्यामुळे सदर गाळ काढणे खूपच किचकट होते. नदीच्या पाण्याची पातळी ही एकसारखी रहात असल्यामुळे पाणी खाली गेल्या शिवाय पाय-यांवरील तो गाळ काढता येत नव्हता. नगरपालिकेकडून देखील सदर गाळ काढण्यासाठी कोणतीही तरतूद झालेली नाही. अशा वेळी दररोज पोहयाला येणा-या पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी तो गाळ काढण्याचे ठरवले.

गाळकाढण्याच्या कामासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नव्हते यावेळी किरण लंगोटे यांनी स्वतःकडील टीकाव व बुट्टी आणून सुरवात केली तर विजय पलमारे या युवकाने त्यासाठी लागणारे साहित्य टिकाव, खोरे व बुटटी विकत घेतली अशा प्रकारे स्वखर्चातून नदी घाटावरील स्वच्छता करण्यास सुरवात झाली. यावेळी या युवकांच्या कडून होत असलेली स्वच्छता मोहीम पाहून नदीवर पोहयाला येणारे सर्व युवक त्यांच्या सोबत जेष्ट नागरिकांनी देखील या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला व जवळ जवळ २१ दिवासांनी महापूरातील आलेला गाळ काढला व नदीतीरावरील घाटाने मोकळा श्‍वास घेतला.
याआधीही जलतरण मंडळाच्यावतीने वरचेवर नदी घाटावरी महादेव मंदीराची स्वच्छता केली जाते तसेच घोरपडे सरकारांच्या समाधी जवळील सर्व परिसराची स्वच्छता केली जाते तसेच २०१९ मधील महापूरामध्ये देखील सर्व घाटाची स्वच्छता जलतरण मंडळाच्यावतीने केलेली आहे.
पंचगंगा जलतरण मंडळाकडून नदीघाटावरील असणा-या महादेव मंदीराची सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी घेतलेली असून तेथे कार्यरत असणारे पुजारी रामाया स्वामी यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून सर्व सदस्यांनी वर्गणी जमा करुन त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केलेली आहे. अशा प्रकारे सर्व कार्यात सहभाग घेवून पंचगंगा जलतरण मंडळाच्या वतीने नेहमीच सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.
या स्वच्छता अभियानास पंचगंगा जलतरण मंडळाचे उपाध्यक्ष आनंदा पेटकर, विजय चव्हाण, विठ्ठल येसाटे, राजू हवळ, सुकांत घोलकर, संपत परदेशी, ॠषिकेश चौधरी, गौतम चौधरी, सतीश सुतार, गुंडू सुतार, संजय पोटे, बिरबल येटाळे, चंद्रकांत ढगे, राजू पारीख, राजू मिरगे, मिलींद पवार,मारुती खामकर, पालकर, परीट, इसाक बागवान, प्रतिक अंगले, लक्ष्मण गणपते, एकनाथ साखरे, डकरे गुरुजी व धनंजय कुलकर्णी आदीचे सहकार्य लाभले.